आज सकाळी ७.४७ ला नेहमीच्या खटारा लोकल ऐवजी , नवी कोरी निळी लोकल , लाजत मुरडत येताना बघून तमाम ठाकुर्ली वासीयांच्या काळजाचा ठोकाच चुकला, आम्ही मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडेच बघत होतो, काय तो थाट. काय ती अदा अहाहा
सगळं पब्लिक आज एक दम शिस्तीत आत शिरलं, आमचा ग्रुप आधीच आतमध्ये बसून टवाळक्या करत होताच, चायला कसाऱ्याच्या चाळीतून एकदम मलबार हिल च्या बंगल्यात गेल्यासारखं वाटल,
बसायला गुबगुबीत गाद्या, मोठ्या मोठ्या खिडक्या, प्रचंड वेगाचे पंखे
जुन्या लोकल मध्ये फ्यान एक इंच हलतील तर शप्पथ, एकाने कंगवा घालून फिरवण्याचा प्रयत्न केला, तर एक पात हल्ल ते वर्षभराची साठलेली धूळ त्याच्या मस्तकावर अर्पण करूनच, तेंव्हापासून सगळ्यांनी फ्यान हा विषय बंद केलेला ,
आज मात्र ह्या जीवघेण्या लोडशेडिंग मधून मुक्त झालो फिदीफिदी
लेडीज आणि जेन्ट्स फर्स्ट क्लास च्या डब्यात जुन्या लोकल मध्ये पार्टिशन असायची, त्यामुळे पलीकडच काही दिसायचं नाही नवीन लोकल मध्ये चक्क स्टील चे रॉड टाकल्याने बर्याच जणांचा प्रवास सुखकर झाला होता
आणि काय तो स्पीड .. वा वा आज ट्रेन कांजूर ला १५ च्या ऐवजी फक्त ५ मिन्तच लेट झाली
.
.
.
.
.
साला खरय सुख मानलं तर कशातही मानता येत, आणि नाही तर कशातही नाही .. अगदी स्वर्गातही
सुख या गोष्टीला विशिष्ट अशी व्याख्या नाही, ती व्यक्तीसापेक्ष बदलते,
प्रत्येक वेळी सुख हे पैशातच विकत घ्यायला हव असं नाही.
तुमच्याही सुखाच्या छोट्या छोट्या (किंवा मोठ्या मोठ्या) कल्पना असतील , स्वप्नं असतील, इथे मांडा
म्हणजे सुख कशाकशात असू शकतं, हे कळेल , आयुष्य अजून सुंदर होईल